- आज ४५३ जणांना बाधा; तिघांचा मृत्यू तर, ४५७ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २५ फेब्रुवारी) रोजी ४५३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष पिंपरी (४१ वर्षे) पिंपळे सौदागर (६८ वर्षे) व ०१ स्त्री पिंपळे गुरव (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०४५०३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९९५१० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८३६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या जाहीर केली आहे. अ – ३७, ब – ७३, क – ६१, ड – ७९, इ – ७७, फ – ४८, ग – ५०, ह – २८, एकुण – ४५३.