न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरीतील अशोकनगर येथे दोघेजण व्हाट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन मटका खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटका जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल फोन, रोकड, असा एकूण १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मटका चालक रवींद्र खुशालसिंग वाल्मिकी (वय ३१), मटका खेळी शेखर सरणदास वाल्मिकी (वय ४६, दोघे रा. अशोकनगर, लिंक रोड, पिंपरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक फौजदार विजय कांबळे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.