- ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असणाऱ्या एकूण ८३९ खाटाही रिक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरीही सद्यस्थितीत ११६८ खाटा रिक्त आहेत. कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभाग, कोरोना रुग्णांसाठी राखीव असलेली रुग्णालये असे मिळून शहरात एकूण २५७५ खाटा आहेत.
सध्या त्यापैकी ११०७ रुग्ण उपचार घेत आहेत. ११६८ खाटा रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना वाढत असताना खाटा रिक्त असल्याने दिलासा मिळाला आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखले केले जाते. अशा कोविड सेंटरमध्ये ४०० खाटा उपलब्ध आहेत, त्यात १७३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
कोविड रुग्णांसाठी ९३४ खाटा आहेत, त्यात ५७० रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या एकूण ८३९ खाटा आहेत, त्यात २ ९५ रुग्ण उपचार घेत आहेत. अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या ६११ खाटा आहेत, त्यात सध्या ६९ रुग्ण सध्या दाखल आहेत. असे एकूण ११०७ रुग्ण उपचार घेत आहेत, तर अजून ११६८ खाटा शिल्लक आहेत.