- बैठकीत ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- मनसेच्या वतीने पिंपरी विधानसभेतील प्रभागांची बैठक घेण्यात आली. पिंपरी विधानसभेतील उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, संघटक व मनसैनीक उपस्थित होते. पिंपरी विधानसभेतील आगामी पक्ष संघटना व निवडणूक बाबतीत नियोजन करण्यासाठी ही बैठक होती.
बैठकीत प्रभाग क्र. १४ आकुर्डी काळभोरनगरच्या उप विभाग अध्यक्षपदी आशिष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभाग क्र. २१ पिंपरी कॅम्प, पिंपरी गाव. प्रभाग अध्यक्षपदी रोहित थरकुडे यांची व शाखा अध्यक्ष पदी किरण वाघीरे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण. प्रभाग संपर्क अभियान अंतर्गत ‘ माझा प्रभाग माझी जबाबदारी’ याचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी किशोर शिंदे यांनी निवडणूक नियोजन व जबाबदारीचे मार्गदर्शन केले.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, मनवीसेचे हेमंत डांगे, बाळा दानवले, दत्ता देवतरासे, रूपेश पटेकर, राजू सावळे, विशाल मानकरी, राजू भालेराव, सुशांत साळवी आदी उपस्थित होते.