- वडगाव न्यायालयात हजर राहून मिळविला अटक पूर्व जामीन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- पोलिसांच्या हातावर तुरी देत गुंड गजा मारणेने थेट वडगाव मावळच्या न्यायालयात पोहचून जामीन मिळवला आहे. एकीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. पथकं देखील रवाना करण्यात आली होती. मात्र, आज दुपारी साडेचारच्या सुमारास वडगावच्या न्यायालयात हजर राहत अटक पूर्व जामीन मिळवला आहे.
तळोजा कारागृह ते पुणे शहरापर्यंत जंगी मिरवणूक काढल्यासारख्या एकाच रांगेत शेकडो आलिशान मोटरी आणि टोल नाका येथून विना टोल केलेला प्रवास त्याच बरोबर फूड मॉल येथे करण्यात आलेली दहशत याप्रकरणी गुंड मारणे आणि त्याच्या शेकडो साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी, ३६ जणांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून १४ आलिशान मोटरी जप्त केल्या आहेत.