- एमआयडीसी भोसरीतील घटना; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- आरोपीची पत्नी फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये काम करत होती. त्याच्या पत्नीचे आणि फिर्यादी यांचे प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्या संशयावरून बुधवारी रात्री साडेसात वाजता आरोपी हा फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आला. त्याने त्याच्या पत्नीसोबत भांडण केले.
तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ, धमकी देऊन हाताने मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरील सिमेंटच्या विटेने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. ही घटना रात्री गुडविल चौक, एमआयडीसी भोसरी येथील गोकुळ स्नॅक्स सेंटर नावाच्या हॉटेलमध्ये घडली.
राजेश भंडारी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रताप अभिमान्या दहितुले (वय ३६, रा. कासारवाडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.