- आरोपीला न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत चुलत्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या वेळी ही सर्व घटना घडली तेव्हा आरोपीच्या घरी कोणी नव्हते. सर्व जण लग्नसोहळ्यासाठी गेले होते. आरोपीचा विवाह झालेला असून त्याला देखील लहान मुले आहेत.
दरम्यान, चिमुकली दिसत नसल्याने तिच्या आईने तिचा शोध घेतला. शेजारी शोधलं, त्याचवेळी आरोपीचा दरवाजा ठोठावला, पहिल्यांदा आत मधून प्रतिसाद आला नाही. मग, पुन्हा आवाज दिला.
आरोपीने दरवाजा उघडला. पीडित चिमुकली रडत रडत आईकडे आली तेव्हा हा सर्व गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.