- दहावीची २९ एप्रिल तर, बारावीची २३ एप्रिल पासून परीक्षेला शुभारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे.
या परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० व दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रात होणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने गही परीक्षा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परिक्षेचं वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेलं आहे.