न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २६ फेब्रुवारी) रोजी ४०८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष सांगवी (७७ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०४९११ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९९७४३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८३७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या जाहीर केली आहे. अ – ५७, ब – ६७, क – ४२, ड – ७१, इ – ४९, फ – ५४, ग २७, ह – ४१, एकुण – ४०८.