- पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलल्याने नाराज झालेल्या भाजपच्या रवी लांडगे यांनी राजीनामा दिला आहे. लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिला आहे.
कै. अंकुशराव लांडगे यांचे कुटुंबीय गेल्या ४० वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ आहे. भाजपकडून लांडगे कुटुंबियांतील रवी लांडगे यांना स्थायीचे सभापतीपद दिले जावे, असा सूर पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत होता.
मात्र, ऐनवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी आज (मंगळवारी) पक्षश्रेष्ठींनी नितीन लांडगे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. या प्रकरणामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.