- प्रशिक्षणासाठी आकुर्डीतील नॅशनल काॅर्पोरेशन इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी संस्थेस मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने ” आमचं गाव आमचा विकास ” उपक्रमांच्या अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुलींनी विविध कौशल्ये आत्मसात करून आपले जिवनमान सुधारण्यासाठी उद्योजकतेेकडे वळावे, यासाठी मुली व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ग्रामीण भागाकरीता केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणा-या १५ व्या वित्त आयोगातंर्गत तरतुद केलेल्या निधीतून ग्रामीण भागातील मुली व महिलांना कौशल्यवृदधीसाठी प्रशिक्षण देण्याबाबत सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने आदेश देण्यात आले आहे. या अनुषंगाने मे.नॅशनल काॅर्पोरेशन ऑफ इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी इंडीया, आकुर्ङी, पुणे यांच्या महिला व मुलींची गरज व आवड तसेच त्यांना उपयुक्त होतील असे विविध अभ्यासक्रम संस्थेच्या वतीने प्रस्तावित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमातून मुली व महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
तसेच कोरोना व्हायरस या संकटकाळात अनेक लोकांनी प्राण गमावले अनेक जण बाधित झाले, यापासून स्वतांची व कुटुंबियांची काळजी कशी घ्यावी याकरीता कोव्हीड १९ संबंधित प्रशिक्षण यासंबंधी कोविड १९ संवेदनशीलता आणि जागरूकता प्रशिक्षण, वृद्धांसाठी देखभाल कोविड १९ संवेदनशीलता आणि जागरूकता प्रशिक्षण, कोविड १९ महिलांनी / मुलींनी स्वतःची व कुटुंबियांची घ्यावयाची काळजी व प्रशिक्षण असे तीन नविन अभ्यासक्रम कोर्सेस या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करण्यात आले आहे.
याकरिता महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांनी आपल्या भागातील महिला व मुलींना स्वयंरोजगाराकरीता स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित ” आपला गाव आपला विकास ” या कार्यक्रमात सहभागी होऊन ” मे.नॅशनल काॅर्पोरेशन ऑफ इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी इंडीया, आकुर्ङी या संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावातील महिला व मुलींना या प्रशिक्षण योजनेत लाभ घेण्याचे आवाहन करावे. ही संस्था पुणे विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांची विषेश अभ्यासक्रमाकरीता मान्यताप्राप्त संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ठराविक कालावधीत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार असून भरपुर प्रत्याक्षिक व माहितीच्या हे प्रशिक्षण देण्यात येऊन प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.