न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २ मार्च) रोजी २८८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील आज मृत झालेला एका ८० वर्षीय पुरुष रुग्ण हा पुण्यातील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०६२४५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १००९४५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८५० जणांचा मृत्यू झालेला आहे.