- वेश्या व्यवसायातून पाच तरुणींची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रकेट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी छापा टाकून सेक्स रैकेटचा पर्दाफाश केला. तसेच वेश्याव्यवसायातून पाच तरुणींची सुटका केली.
पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने वाकड येथे सोमवारी (दि. १) ही कारवाई केली. विशाल पवनकुमार अग्रवाल (रा. मोहननगर, चिंचवड), आबासाहेब भाऊसाहेब तागड (रा. पिंपळे गुरव) आणि एका महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे फॉरेव्हर स्पा झोन स्किन केअर या स्पा सेंटरमध्ये सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पाच तरुणींची पोलिसांनी सुटका केली. आरोपी तिघे जण हे स्पा सेंटर भागीदारीत चालवत होते. तसेच स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी स्पामध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.