- जिमची तोडफोड पडली महागात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- जिमचे भाडे वाढवून दिले नाही म्हणून कुलूप तोडले. त्यानंतर जिममधील साहित्य तोड्न दोन लाख रुपयांचे नुकसान करून आठ हजार रुपयेही चोरून नेले. भोसरी येथे २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधित हा प्रकार घडला होता.
याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. प्रशांत पोपट फुगे (वय ३५, रा. भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रशांत हा भाजप नगरसेविका भीमाबाई फुगे यांचा मुलगा आहे. अनिल अशोक फुगे (वय ३८, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मार्च २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.