- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरात १० मदत केंद्र तयार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमधील २७ टक्के जागा आरक्षित असतात. ज्या विद्यार्थ्यांना आरटीईच्या माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना बुधवारपासून अर्ज भरता येणार आहे. अर्ज ३ ते २१ मार्च या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत.
यंदा पिंपरी – चिंचवड शहरातील १८६ शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली आहे. या १८६ शाळा मिळून ३३२३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. पालकांना अर्ज भरण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने शहरात १० मदत केंद्र तयार केले आहेत. या मदत केंद्रांवर पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे घेऊन ऑनलाइन अर्ज भरून घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केले आहे.
फकिरभाई पानसरे प्रायमरी उर्दू स्कूल, आकुर्डी, कल्पना इंग्लिश स्कूल, निगडी, एस.एन.बी. पी. इंटरनेशनल स्कूल मोरवाडी, जी. एस. के. इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, भोसरी, किड्स पॅराडाईज इग्लिश मीडियम स्कूल, च-होली, इनफन्ट जेयुस प्रायमरी स्कूल, कासारवाडी, एम. एम. स्कूल काळेवाडी, एस. पी. स्कूल, वाकड, किलबिल स्कूल, पिंपळे गुरव, या दहा केंद्रांवर अर्ज भरता येणार आहेत.