न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस बी पाटील महाविद्यालय, रावेत, येथे मराठी विभागातर्फे, शनिवार दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन व कवीवर्य कुसुमाग्रज जयंती मोठया उत्साहात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात कवी, लेखक, समीक्षक व सूत्रसंचालक प्रा. विजय लोंढे उपस्थित होते. प्राचार्य संदीप पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठीच्या उगमापासून आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रा विजय लोंढे यांनी आपल्या भाषणात वाचन संस्कृती जोपासण्याचे तळमळीने आवाहन केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व अध्यापकांनी मराठीतील पारंपरिक कविता, भारूड, अभंग, गवळणी आदींचे सुश्राव्य सादरीकरण केले. तसेच एक निबंध स्पर्धा घेण्यात आली, ज्यात विद्यार्थीं व प्राध्यपकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पदमाताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त गोरख भालेकर, कार्यकारी निर्देशक गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रदीप कासार यांच्या आभार प्रदर्शनाने या सोहोळ्याची सांगता झाली.