- चिंचवडच्या प्रतिभा महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२१) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनियर कॉलेज व टी. जे. एस. बी. बँकेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ॲड. प्रीती साठे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना समाजातील, कुटुंबातील महिलांचे स्थान महत्वाचे असून असे सांगत कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील प्रत्येकाला आर्थिक संपत्तीचा सर्वाना व्यवस्थित लाभ घेता यावा यासाठी मृत्यू आधी आपले मृत्यूपत्र करणे ही काळाची गरज आहे, असे सांगितले व मृत्युपत्रसंबंधी पूर्ण माहिती दिली.
तसेच टी. जे.एस.बी.बँकेचे मॅनेंजर दीपक देशपांडे यांनी महिलांना गुंतवणुकीच्या विविध योजनांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी सर्व महिला अध्यापिका व कर्मचारी यांना महिलांचे समाजातील स्थान या विषयी मार्गदर्शन केले. तसेच महिला अध्यापिकांना भविष्याचा विचार करिता बँकेमध्ये गुंतवणूक करण्यास सांगुन स्वावलंबी बनण्याचा मंञ दिला.
महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी महिला शिक्षकांना विविध कला गुणदर्शन सादर करण्यास संधी दिली. यामध्ये महिला शिक्षकांनी विविध खेळ, अभिनय, गायन, नृत्य इ.चे सादरीकरण केले. उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्रचर्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. पौणि॔मा कदम इत्यादि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी तर, आभार प्रा. शबाना शेख यांनी मानले.