- हवेच्या चक्रीय स्थितीमुळे पुढील दोन दिवस पावसाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. मार्च २०२१) :- सध्या संपूर्ण मध्य भारतावरच कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत. परिणामी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आदी राज्यांत पावसाला अनुकूल स्थिती आहे.
राज्यात सध्या मराठवाडा आणि लगतच्या भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाऊस कुठे?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १९ ते २२ मार्च या कालावधीत औरंगाबाद, जालना, परभणी, पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, हिंगोली, नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा.
२१ आणि २२ मार्चला रायगड, रत्नागिरीर्, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह््यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.