- अवैधधंदे चालकांकडे कानाडोळा; पोलीस आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अवैधधंदे सुरू असल्याचे निदर्शनास येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची माहिती काढली जात असून त्यांची वेगळी नोंद होत आहे. महिन्याभरात त्यांची उचलबांगडी करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
आयुक्तांनी सूचना दिल्यानंतरही संबंधित पोलीस निरीक्षकांनी अवैध धंदे बंद किंवा त्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली.
आयुक्तांनी अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. काही पोलीस निरीक्षकांकडून त्याबाबत खुलासा मागवला आहे. महिन्याभरात जनरल बदल्या करण्यात येणार आहेत. कार्यक्षम नसलेल्या वरिष्ठ निरीक्षकांची त्यावेळी बदली केली जाणार आहे, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.