- अनोळखी चोरट्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- फिर्यादी शिंदे हे रिक्षा चालक आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी त्यांची ९० हजारांची तीनचाकी रिक्षा (एम एच १४ / जी सी ७४४२) रावेतच्या शिंदेवस्ती मधील मिडटॉन सोसायटी येथे पार्क केली होती.
रात्री एक वाजताच्या सुमरास अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) रात्री घडली. प्रकाश साहेबराव शिंदे (वय ३०, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. परभणी) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.