- दुधामधून गर्भपाताच्या गोळ्या देऊन विवाहितेचा गर्भपात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- पतीने विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक संभोग केला. सासरच्या लोकांनी विवाहीतेकडे माहेरहून दुधाच्या व्यवसायासाठी पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.
विवाहितेला दुधामधून गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा तीन वेळेला गर्भपात केला. विवाहितेच्या आई-वडिलांना मारहाण करून त्यांचा अपमान केला. विवाहितेला नांदवण्यास नकार दिला असे फिर्यादीत म्हटले आहे. विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे.
विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती, सासू, सासरे, मोठा दीर, नणंद, नंदावा आणि मावस दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ मे २०१९ ते १२ मार्च २०२१ या कालावधीत जाधववाडी, चिखली येथे घडला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.