न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक समोर येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनाकडून नियम व निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
तरीही त्याकडे दुर्लक्ष करून काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. मास्कविना फिरणा-या ५८८ नागरिकांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.