न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- किरकोळ वादातून तिघांनी दोघांना दगड आणि बॅटने मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे शनिवारी (दि. ३) रात्री घडली. याप्रकरणी राजेश बक्षोमल जेठाणी (५७, रा. ओम साई अपार्टमेंट, पिंपरी) यांनी रविवारी पिंपरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कमलेश सतरामदास शिरवाणी (वय ४४) राजा सतरामदास शिरवाणी (वय ४६) आणि भावेश राजा शिरवाणी (२१, तिघेही रा. सुभाषनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फियांदी हे सुभाषनगर, पिंपरी येथून चालले होते. मेहूण्याचा वाद सुरू असल्याचे दिसल्याने ते थांबले. मात्र, वाद मिटत नसल्याने ते पुन्हा जाऊ लागले. त्यावेळी आरोपींनी फीर्यादी यांना बॅट आणि दगडाने मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी मेहूणा गोपाल आणि त्याची पत्नी आली असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.