- भोसरी पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश..
- मुख्य डीलरसह सहकाऱ्यांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- भोसरी येथील लांडगे नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात भेसळयुक्त डिझेलची विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेआठ वाजता मैदानात जाऊन खात्री केली असता तिथे भेसळयुक्त डिझेलची विक्री सुरु होती. तिथून पोलिसांनी एक पिकअप, दोन आयबीसी टँकर, ऑईल विक्रीचे रीडिंग दाखवणारी मशीन, डिझेल मोजण्याचे साधन असा एकूण काही लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात पोलिसांनी ऋषिकेश आणि रोहन या दोघांना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान माहिती मिळाली की, भेसळयुक्त डिझेल त्यांनी सुधीर बागलाने याच्याकडून आणले आहे. त्याने केलेला डिझेलचा साठा देखील आरोपींनी पोलिसांना दाखवला. त्यानुसार पोलिसांनी बागलाने याला अटक करून त्याच्याकडून दोन टँकर, २० हजार लिटर भेसळयुक्त डिझेल असा मुद्देमाल जप्त केला.
बागलाने याच्याकडे चौकशी करून त्याला भेसळयुक्त डिझेलचा पुरवठा करणारा मुख्य डीलर कैलाश पंजाबी याला देखील पोलिसांनी अटक केली. तसेच दोन ग्राहकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुरवठादार कैलाश पंजाबी, डीलर सुधीर बागलाने, सबडीलर ऋषिकेश सतीश कदम, रोहन शशिकांत हडपे, ग्राहक शहनवाज नजीर बेग, शौकत नजीर बेग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.