न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ०६) रोजी २९०४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १६७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष – चिंचवड (४७, ७१ वर्षे), थेरगांव (६५,६७ वर्षे), कासारवाडी (५० वर्षे), पिंपळे निलख (६८ वर्षे), दापोडी (६१ वर्षे), खराळवाडी (४५ वर्षे), शाहूनगर (८१ वर्षे), कस्पटेवस्ती (६५ वर्षे) ०५ स्त्री – चिंचवड ( ४०वर्षे), भोसरी (७३वर्षे), निगडी (६२ वर्षे), काळेवाडी (५४ वर्षे), सांगवी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – घोरपडी (५६ वर्षे), धायरी (५३ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ९ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १५५९८४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३०१२९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०९४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ४१६, ब – ४८७, क – २५९, ड – ५२३, इ – २४०, फ – ३९९, ग – ३८९, ह – १९१, एकुण – २९०४.