- आवश्यक पाण्याचा साठा करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- एमआयडीसीकडून होणा-या पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि. ८) करण्यात येणार आहे. गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
शुक्रवारी (दि. ९) पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे