- कुणीही यावे अनं दमबाजी करावी; ‘कोविड योध्यांची मरणासन्न अवस्था..
- आयुक्तांना विजय पाटलांनी सुचविल्या मार्गदर्शक सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :- गेल्या ११ महिन्यांपासून कोरोनाने बाधित होऊन मरण पावलेल्या व्यक्तींच्या बॉडीची सुस्थितीत योग्य नियमांचे पालन करून विल्हेवाट लावण्यासाठी म्हणजेच स्मशान अंतिम विधी करण्यासाठी महत्वाची अशी ‘कोरोना बॉडी स्कॉड युनिट’ ची पालिकेने स्थापना केली. या युनिटकरिता १६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या दररोज सरासरी १४ बॉडी ह्या युनिट कडे येत आहेत. अतिशय संवेदनशील अवस्थेत आणि जीवाची पर्वा न करता हे कर्मचारी शहरातील कोविड च्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहेत. परंतु ह्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य जागा आणि सुरक्षित केबिन ची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची अवस्था दयनीय होऊन बसली आहे. मरण पावलेल्या काही रुग्णांचे नातेवाईक सरळ बॉडी असलेल्या ठिकाणी येऊन कोविड नियमांचे उल्लंघन करतात.
कर्मचाऱ्यांशी दमबाजी, शिवीगाळ करतात, प्रसंगी मारहान करतात. कर्मचाऱ्यांसाठी “बॉडी” ठेवण्यासाठी योग्य कार्बन स्टील च्या स्ट्रेचर ची व्यवस्था नसल्यामुळे व सुरक्षा साधनांची कमतरता असल्यामुळे दरोरोज जीव धोक्यात घालून हे कर्मचारी प्रामाणिक सेवा बजावत आहेत. अश्या पद्धतीने योग्य नियोजन न केल्यामुळे ह्या सर्वच कोविड योध्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” सध्या आपले पिंपरी चिंचवड शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अडकलेले आहे. दररोज ३००० पेक्षा जास्त रुग्ण कोविड १९ च्या विषाणूने बाधित होत आहेत. दररोज बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या संदर्भात कोरोना ने मृत्युमुखी पडलेल्या मित्राच्या बॉडी संदर्भात यशवंतराव चव्हाण रुग्णालयात गेलो असता त्या ठिकाणी असे विदारक दृश्य नजरेस पडले. कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेचे असे ढिसाळ नियोजन एका श्रीमंत महापालिकडून होणे हे दुःखदायी आणि दुर्दैवी आहे. यासाठी खालील उपाय तातडीने करणे आवश्यक वाटते. आयुक्त राजेश पाटील यांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालावे असेच वाटते.”
पुढील नियोजनाची आवश्यकता….
१. कोविड स्कॉड बॉडी युनिट कडे येणाऱ्या प्रत्येक बॉडी ला “फर्स्ट कम” (प्रथम येणाऱ्या बॉडीस प्राधान्य) पद्धतीने सिरीयल न. असावा. त्यामुळे कोणीही नातेवाईक मध्येच येऊन बॉडी नेण्याची घाई करणार नाही किंवा दमबाजी करणार नाही. त्यावर वैदयकीय अधिकाऱ्यांची सही असावी.
२. बॉडी स्कॉड युनिट च्या प्रमुख कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र छोटी सुरक्षा कॅबिन असावी म्हणजे कोणीही रस्त्यावरची वागणूक देण्यासारखी पद्धत अवलंबणार नाही. दमबाजी आणि मारामारी करणार नाही.
३. सदरच्या ठिकाणी बॉडी देताना जवळच्या दोन व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, गावजत्रेसारखी १५ ते २० जणांची गर्दी बॉडी पंडाल मध्ये होणार नाही. हमरीतुमरीची वेळ येणार नाही.
४.एम एस चे स्ट्रेचर हे बॉडी वजनामुळे वाकून जाते त्या ऐवजी स्ट्रेचर ट्रॉली ही कार्बन स्टील ची मजबूत पण हलक्या वजनाची असावी.
५.प्रत्येक बॉडी युनिट च्या कर्मचाऱ्यास एक पालिकेचा ड्रेस कोड असावा म्हणजे त्यांच्यावर हल्ले होणार नाहीत.
अजून कोविड चा मुक्काम 6 महिने शहरातून जाण्याची शक्यता नाही. कोविड ने पीक गाठण्याची शक्यता असल्याकारणाने ‘बॉडी स्कॉड युनिट’ व्यवस्थित कार्यरत असणे अत्यावश्यक आहे, असे मत विजय पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.