न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :- युवा नेते कुणाल थोपटे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राज्याचे युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
येणाऱ्या काळात पक्षवाढीचे काम आपण जोरात कराल अशी अपेक्षा आहे व आपल्या पुढील राजकीय वाटचालीस मनापासून शुभेच्छा, असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष विशाल वाकडकर उपस्थित होते.