- फायनान्स कंपनीचीही फसवणूक; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२१) :- पिंपळे गुरवमधील जवळकरनगर येथे लेन नंबर एकमध्ये कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना न घेता खोट्या बांधकाम परवानाद्वारे चार मजली इमारत बांधली. तसेच एकासोबत संगनमत करून आरोपींनी दुय्यम निबंधक हवेली १८ यांच्या कार्यालयातील कुलमुखत्यार पत्राद्वारे फिर्यादी यांच्या हिस्स्यातील शांताई अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेची विक्री केली.
विक्री केलेल्या सदनिकेवर आरोपी आणि त्याची पत्नी यांनी अस्पायर होम फायनान्स, फुगेवाडी या फायनान्स कंपनीकडून १४ लाख ५५ हजार ३४४ रुपयांचे कर्ज घेतले. त्याचे हप्ते न भरता आरोपींनी फसवणूक केली. हा प्रकार २०१२ ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत घडला.
याबाबत अनिल मारुती भालेराव (वय ५६, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ७) फिर्याद दिली आहे. प्रशांत सुरेश शिरसाट (रा. काटेपूरम चौक, पिंपळे गुरव), आशुतोष सुनील नितनवरे (रा. पिंपळे गुरव), दीपक कडूबाळ गायकवाड (रा. पिंपळे गुरव), ज्ञानेश्वर जगदीश पाटील, सुवर्णा ज्ञानेश्वर पाटील (दोघे रा. दिघी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.