- तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. थेरगाव येथे बुधवारी (दि. ७) दुपारी एकच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
राहुल जाधव (रा. पुणे), गणेश धनवडे तसेच एजंट असलेली सुनीता गुलाब जाधव (वय १९, रा. साने चौक, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौकाजवळील सृष्टी स्पा सेंटर येथे आरोपी हे तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते. त्यातून मिळणाऱ्या उत्पनातून अर्धी रक्कम स्वतःकडे ठेवून घेत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.