न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रकारे मास्क न वापरता फिरणाऱ्या ३८६ जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. ७) कारवाई केली आहे.
एमआयडीसी भोसरी (३९), भोसरी (१९), पिंपरी (२), चिंचवड (७२), निगडी (१५), आळंदी (४५), चाकण (१६), दिघी (३४), सांगवी (४१), वाकड (२१), हिंजवडी (२०), देहूरोड (१३), तळेगाव दाभाडे (००), तळेगाव एमआयडीसी (००), चिखली (२०), रावेत चौकी (२३), शिरगाव चौकी (७), म्हाळुगे चौकी (००) या पोलीस ठाण्यांकडून बधवारी ३८६ जणांवर कारवाई झाली.
शहरात कोरोनाचा उद्रेक असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.