- बँकेचे ग्राहक व बँकेची फसवणूक; हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून २९ लाख ७४ हजार ८३३ रुपये एवढी रक्कम विमानाच्या तिकीट बुकिंगसाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत बँकेकडून पोलिसात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. मिलिक अर्जुन परमेश्वर नंदर्गी (वय ४०, रा. हिंजवडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. ७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाइन माध्यमातून घडला आहे. फिर्यादी नंदर्गी आयसीआयसीआय बँकेत डेप्युटी मॅनेजर आहेत. त्यांच्या बँकचे ग्राहक अनिल शिवाजी घाडगे (रा. वाकड) यांच्या क्रेडिट कार्डची माहिती अज्ञात व्यक्तीने हॅक केली. त्या माहितीच्या आधारे अज्ञात व्यक्तीने विमानाचे तिकीट खरेदी केले. त्यासाठी त्याने २९ लाख ७४ हजार ८३३ एवढी रकम वापरली. यामुळे बँकेचे ग्राहक आणि बँक अशी दोघांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.