- वाचा व शिस्त पाळा; कोरोना टाळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात शनिवार व रविवार या दिवशी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असणार आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांनी पालिका हद्दीत कडक निर्बंध लागू केलेले आहेत. हा आदेश दि. ०९.०४.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.
- दरम्यान विद्यार्थ्यांना / परीक्षार्थीना सर्व प्रकारच्या परीक्षा / स्पर्धा परीक्षेकरिता घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत / परीक्षा केंद्रापासून घरापर्यंत सोमवार ते ०६.०० ते सकाळी ०७.०० पर्यंत तसेच शुक्रवार सायंकाळी ६.०० ते सोमवार सकाळी ०७.०० पर्यंत ( संचारबंदीच्या काळात ) प्रवास कारणेस परवानगी राहील. परीक्षार्थी सोबत त्यांच्या पालकांना देखील शुक्रवार सायंकाळी प्रवास करणेस परवानगी राहील. मात्र विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवास करताना सोबत परीक्षेचे हॉल तिकिट ( Admit Card ) बाळगावे तसेच या सवलतीचा गैरवापर टाळावा.
- शुक्रवार सायंकाळी ०६.०० ते सोमवार सकाळी ०७.०० या संचारबंदीच्या काळात फक्त मेडिकल विक्री दुकाने वगळून सर्व दुकाने बंद राहतील. दुध विक्रीची दुकाने फक्त सकाळी ०६.०० ते ११ वेळेत सुरु राहतील.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकार या ऑनलाईन सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या (ई – कॉमर्स) (Swiggie, Zomato. इ.) कर्मचाऱ्यांना आठवडयातील सर्व दिवस प्रवास करणेस परवानगी राहील. शुक्रवार सायंकाळी ०६.०० ते सोमवार सकाळी ०७.०० या संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांना हॉटेलमध्ये जावून पार्सल घेणेस प्रतिबंध राहील. हॉटेल, रेस्टॉरंट, बार मार्फत घरपोच पार्सल सेवा सुरु राहतील.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस / नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी राहील.
- स्पर्धा परीक्षा असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खानावळी ( मेस ) या फक्त पार्सल सेवेसाठी सर्व दिवस सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०८.०० या वेळेत सुरु राहतील.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने अॅप द्वारे तसेच होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वेळेत सुरु राहतील.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
- दिनांक ०५.०४.२०२१ अन्वये ज्या उद्योग / आस्थापना यांनी त्याचे कर्मचाऱ्यांची कोविड – १९ निगेटिव्ह ( RTPCR ) प्रमाणपत्र सोबत ठेवण्याचे आदेशित केले आहे , त्यांना Rapid Antigen Test करून कोविड -१९ निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगणेस देखील परवानगी राहील.
- सदर आस्थापनावरील कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. तोपर्यंत त्यांनी कोविड -१९ निगेटिव्ह ( RTPCR / RAT ) असल्याचे १५ दिवसांची वैधता असणारे सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- केंद्र सरकार / महाराष्ट्र शासन / पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार, अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.