न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ०९) रोजी २००९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १७९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – चिखली (६८, ६०, ६१ वर्षे), पिंपळे निलख (४८ वर्षे), रहाटणी (५८ वर्षे), आकुर्डी (५९ वर्षे), भोसरी (५२ वर्षे), काळेवाडी (८१ वर्षे) : ०९ स्त्री वल्लभनगर (८५ वर्षे), वाकड (६२ वर्षे), चिखली (६४ वर्षे), निगडी (७५ वर्षे), थेरगांव (७१ वर्षे), पिंपरी (३५,४६ वर्षे), मोशी (४५ वर्षे), चिंचवड (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष- केंदूर (९५ वर्षे), कोंढवा (६७ वर्षे), लोहगांव (६९ वर्षे) : ०३ स्त्री – पुणे (५४ वर्ष), बोपोडी (७० वर्षे), आळंदी (८० वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १६३१२८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३५६६३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २१३९ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २००, ब – ३३५, क – २११, ड – ४१५, इ – १९०, फ – १७९, ग – २४१, ह – २३८ एकुण – २००९