- वाकडच्या काळाखडक परिसरातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- रस्त्याचे काम करीत असताना महावितरणच्या भूमिगत तारांचे नुकसान केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ मार्च रोजी वाकड येथे घडल. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सनी टोपे (३२, रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार एस.के.येवले अँड कंपनीचे संचालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील काळा खडकनजीक रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कामात निष्काळजीपणा केल्याने महावितरणच्या भूमिगत तारांसह अन्य साहित्याचे एकूण एक लाख रुपयांचे नुकसान झाले.