- पोलिसांना काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- खंडणीविरोधी पथक नाशिक फाटा येथून वाकडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. वाकड – हिंजवडी उड्डाण पुलाखाली असलेल्या वाकड चौकीच्या दोन खोल्यांमध्ये पथकाचे कामकाज सुरू झाले आहे.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खडणी आणि दरोडा प्रतिबंधक विभाग वेगळे केले. कित्येक दिवस या दोन्ही विभागाचे कामकाज नाशिक फाटा येथील एकाच इमारतीतून सुरू होते.
दरम्यानच्या काळात दोन्ही विभागांना काम करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे खंडणी विरोधी पथक वाकड येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नुकतेच वाकड-हिंजवडी उडाणपुलाखाली चौकीच्या दोन खोल्यांमध्ये पथकाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.