थेरगावातील प्रकार; महिलेसह इतरांवर गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत महिलेने तरुणाकडे दहा हजारांची खंडणी मागितली. हा प्रकार ६ फेब्रुवारी २०२१ रोजी डांगे चौक, थेरगाव येथे घडला. या प्रकरणी रोहित संजय पाबळकर (२३, रा. डांगेचौक, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सोनाली नामदेव ढमाले (रा. दुर्गा कॉलनी, गणेशनगर, थेरगाव), गणेश रामदास रावठकर (२४, रा. पाषाण पुणे) याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घराबाहेर आले असता आरोपी महिलेने त्यांना हटकले. त्यावेळी रोहित यांनी त्यांना महिलेला बाजूला होण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यात वाद दरम्यान, अन्य दोन आरोपी तेथे आले त्यांनी फिर्यादीला छेडछाड केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडे दहा हजारांची मागणी केली. तसेच, त्यांच्याकडील दोन हजार रुपये हिसकावून घेत त्यांना मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी रोहित यांनी न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.