- कोरोनाबाबत केले दिशाहीन वक्तव्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- देशामधील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या नऊ जिल्ह्य़ांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदींनी एक गंभीर चूक केली आणि त्यावरच आता काँग्रेसने मोदींवर निशाणा साधलाय.
अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधांनी देशामध्ये पॉझिटिव्ह केस वाढल्या पाहिजेत असं म्हटलं. करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी करण्याचं उद्देश समोर ठेवावं असं सांगताना मोदींनी चूकून करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवण्यावर लक्ष द्यावं असं म्हटलं.
पंतप्रधान मोदी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. यामध्ये पंतप्रधान मोदी, “वेगाने पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढो, वेगाने चाचण्यांची संख्याही वाढवी या साऱ्या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे,” असं म्हणताना दिसतात. काँग्रेसने हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत मोदींवर निशाणा साधालाय आणि मोदी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढवण्याच्या गोष्टी करत आहेत. डोक्यात जे आहे तेच त्यांच्या जीभेवर आलं आहे, असा टोला लगावलाय.