न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२१) :- किवळे-विकासनगर येथे महामार्गावर दोन दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वारासह तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाचा अपघातस्थळी व इतर दोघांचा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे.
ही घटना मंगळवारी (दि १ ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. एकजण जखमी असून उपचारासाठी देहूरोड येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.