न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- राहत्या घरात छताच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. काळेवाडी येथे बुधवारी (दि. १६) हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मेघनाथ गोरख पोटफोडे (वय २०, रा. आदर्शनगर, काळेवाडी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला त्वरित महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.