- थेरगावातील घटना; वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- मित्राच्या मुलीस आरोपी वारंवार त्रास देत होता. मित्राने फिर्यादी यांना आरोपीला समजावून सांगण्यास सांगितले होते. या कारणावरून चिडलेल्या आरोपीने आणि त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीला रस्त्यात अडवून सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १५) सायंकाळी गणेशनगर, थेरगाव येथे घडली.
आकाश युवराज कांबळे (वय २९, रा. विवेकानंदनगर कॉलनी, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. १६) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पवन गायकवाड (रा. आदर्श कॉलनी, वाकड), अजय कांबळे (रा. गणेशनगर, थेरगाव) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.