- चिंचवडमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- चिंचवड येथून भाच्याचे काही जणांनी अपहरण केले आहे, असा फोन करून आरोपी मामाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपहरण झालेला माझा भाचा असून, त्याच्यासोबत माझा विधिसंघर्षित मुलगा आहे, असेही आरोपी मामाने पोलिसांना सांगितले. मात्र तपासात मामा मूळगावी जाऊ देणार नाही, म्हणून दोन भावांनी अपहरणाचा बनाव केला, असे उघडकीस आले.
मामा, भाचा आणि मामाचा १७ वर्षीय विधीसंघर्षीत मुलगा, या तिघांच्याही विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथे गुरुवारी (दि. १७) सकाळी ही घटना घडली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.