न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- जुन्या सांगवीत एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अरुण मधुकर दीक्षित (वय ५०, रा. जुनी सांगवी), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांचे ते वाहन चालक होते. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सांगवी पोलिस पुढील तपास करीत आहेत.