- पाच इंग्रजी व एका मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शहरात ६ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले होते.
यामध्ये ग्रँट मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, कुदळवाडी, मास्टर केअर इंग्लिश मीडियम स्कूल भोसरी, ज्ञानराज प्राथमिक शाळा कासारवाडी, ज्ञानसागर इंग्लिश स्कूल (प्राथमिक) चिखली, मॉडर्न पब्लिक स्कूल रहाटणी, एम.एस.स्कूल फॉर किड्स अशा पाच इंग्रजी माध्यम व एक मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा अनधिकृरित्या चालविण्यात येत होत्या.
संबंधित शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पर्यवेक्षकांना दिलेले आहेत. शहरातील या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणाऱ्या नुकसानीस ते स्वतः जबाबदार राहतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.