न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२१) :- वाकड पोलीस ठाण्यातून बदली करण्यात येऊन सामाजिक सुरक्षा पथकात नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
भावाच्या विरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होत असताना जमावाला भडकावले. भुदरगड पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली होती.
त्याची सुनावणी सुरू असताना चौकशीतील सरकारी साक्षीदारांसोबत त्यांनी बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रणिल मारुती चौगले, असे निलंबित केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.