- भोसरीमधील पत्री इंजिनियर कंपनीतील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून २०२१) :- कंपनीत प्रवेश करून चोरट्यांनी २९ हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम रॉड चोरून नेले. १३ जून रोजी पहाटे चार ते सकाळी सहा या कालावधीत एमआयडीसी भोसरीमधील पत्री इंजिनियर कंपनीमध्ये हा प्रकार घडला.
रामनगौडा प्रसन्नागौडा पाटील (वय ४८, रा. पिंपळे सौदागर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या जनरल ब्लॉक येथे असलेल्या कंपनीमध्ये चोरट्यांनी करून २९ हजार रुपये किमतीचे रॉड चोरून नेले.