- पालिकेकडून तिसऱ्या लाटेची तयारी; सर्वसाधारण सभेचीही मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून. २०२१) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून ऑक्सिजनची वाढती गरज पाहता महापालिकेच्या वतीने भोसरी येथील नवीन रुग्णालयाजवळ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मोकळ्या निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यास नुकतीच सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.
भोसरी येथील नवीन रुग्णालयाच्या पूर्वेकडील बाजूस असलेली सर्वे क्रमांक १/३ पैकी ३० मीटर लांबीचा आणि १५.५० मीटर रुंदीच्या २४ मीटर रुंद रस्त्याला लागून निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र महापालिकेच्या विकास योजनेत निवासी विभागात सामाविष्ट आहे.
साथरोग अधिनियम १८९७ मोकळ्या आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ मधील कलमनुसार मोकळया निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र ऑक्सिजन प्लांटसाठी खासगी वाटाघाटीने ताब्यात घेण्यास आणि ताब्यात येणाऱ्या क्षेत्राचा मोबदला (३० टक्के दिलासा रकमेसह) संबंधित नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी १३ हजार ३०० प्रति चौरस मीटर या दराप्रमाणे ८० लाख ३९ हजार ८५० रुपये इतके मूल्यांकन केले जाणार आहे.