- उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून. २०२१) :- उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सोमवारी (दि. २१) रोजी पिंपळे सौदागर येथे प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत योग दिन साजरा करण्यात आला.
उन्नतिचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे, आनंद हास्य क्लबचे अध्यक्ष राजेंद्रनाथ जयस्वाल, फाउंडेशनचे सभासद व आनंद हास्य योग क्लबमधील सभासद आदींनी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची आसन केली.
योगाचा सतत अभ्यास केल्याने त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य लाभते. योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग आहे. कोरोनाचे संकट अजुनही टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कुंदाताई भिसे यांनी केले.