- ४५ वर्षावरील नागरिकांना कोव्हॉक्सीन’ चा डोस
- लसीकरण केंद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या मंगळवारी (दि. २२) रोजी ‘ कोविशिल्ड ’ चा डोस ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील फक्त पहिला डोस हा कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या ५० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या ५० टक्के लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, सखुबाईगार्डन, भोसरी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल , इंद्रायणी नगर , भोसरी, छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी, (सी एस एम) पिं.चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) संजय काळे सभागृह साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी घरकुल दवाखाना चिखली पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली रुपीनगर शाळा तळवडे समाज मंदीर शाळा यमुनानगर रुग्णालय प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती भाणसे स्कुल तळवडे आचार्य अत्रे सभागृह, वाय.सी.एम रुग्णालयाजवळ मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल नेहरुनगर उर्दु शाळा पिंपळेगुरव माध्यमीक शाळा अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा कासारवाडी दवाखाना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ( जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे बिजलीनगर दवाखाना फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडी सेक्टर नं.२९,मोरेश्वर भोंडवे कार्यालया जवळ,पुनावळे मनपा शाळा किवळे कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवड खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव पिं.चिं. मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग पि. चि. मनपा शाळा, वाकड पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ या ३८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने हा डोस मिळेल.
तसेच कोव्हॉक्सीन’ चा फक्त दुसरा डोस हा वय वर्षे ४५ वर्षावरील २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना नवीन भोसरी रुग्णालय या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
तसेच उद्या वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना व एचसीडब्ल्यू/एफएलडब्ल्यू यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सी सेंटर स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी एस.एस.अजमेरा स्कुल, अजमेरा क्वालिटी सर्कल, भोसरी गंगोञी पार्क,दिघी बासकेट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशी गणेश इंग्लिश स्कुल,दापोडी शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे प्रेमलोक पार्क दवाखाना अश्विनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड मनपा शाळा, वाल्हेकरवाडी या १८ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि. २२/०६/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.