न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या पुणे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन संदीप काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या या वैचारिक चळवळीसाठी आपण वेळ, श्रम देवून संघटनेत सातत्याने चांगले काम करीत आहात. तसेच आपले शैक्षणिक क्षेत्रातील मोलाचे योगदान लक्षात घेता आपली संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची माहिती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी दिली.
संदीप काटे यांच्या निवडीचे शैक्षणिक संस्था चालकांनी अभिनंदन केले आहे.